>
>
>

Top 10- 13th August 2020

10 views
Pune Metro
Published By Pune Metro On Aug 13, 2020
Category :

News/Politics


Duration : 06:39

Description:
माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्‍लर 'युनिसेफ'सारख्या वैश्‍विक संस्थेबरोबर काम करीत असते. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त तिने आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत. यंदाच्या युवा दिनाची थीम 'यूथ एंगेजमेंट फॉर ग्लोबल अ‍ॅक्शन' अशी आहे. या थीमचा उद्देश स्थानिक, राष्ट्रीय आणि वैश्‍विक स्तरावर तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठीचे मार्ग खुले करणे हा आहे. सध्याच्या डिजिटलीकरण आणि औद्योगिक उन्‍नती देशातील तरुणांसाठी वरदानही आहे आणि शापही आहे असं मानुषीने म्हटले आहे.देशातील तरुणाई तंत्रज्ञानाच्या लाटेवर सवार आहे. एकीकडे याचे अनेक लाभ आहेत तर दुसरीकडे तोटेही आहेत असे उद्गार तिने काढलेत.आपल्या चुकांमधून शिकून आपल्याला नवी ओळख बनवता आली पाहिजे असा संदेश तिने आजच्या तरुणाईला दिलाय.
बातमी 2 ,वॉशिंग्टन
H-1B व्हिसाधारकांना अमेरिकेतील सत्ताधारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने दिलासा देत H-1B व्हिसावरील निर्बंधात थोडी शिथिलता आणली आहे. तत्पूर्वी H-1B व्हिसाधारकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने लागू केला होता. जे नागरिक लॉकडाउन आधी काम करत होते, H-1B व्हिसाधारकांना त्याच नोकरीसाठी अमेरिकेत परत यायचे असेल तर, त्यांना परवानगी देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर व्हिसावरील निर्बंध शिथिल करताना H-1B व्हिसाधारकाच्या पत्नीलाही अमेरिकेत परतण्याची परवानगी दिली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या निर्बंध शिथिल करण्याचा सर्वाधिक फायदा भारतीयांना होणार आहे.
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.जिल्हा राखील दल, २०१ बटालियन कोबरा आणि २२३ बटालियन सीआरपीएफच्या जवानांनी सुकमामधील जगरगुंडा जंगल परिसरात संयुक्तरित्या राबवलेल्या शोधमोहीमेअंतर्गत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.चकमक झालेल्या ठिकाणाहून जवानांनी मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास जगरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीत चकमकीला सुरूवात झाली होती.

MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group

TAGS:
Top, 10, 13th, August, 2020

show [+]
 
Now your video play on all smartphones.

Copy the code and paste in your html document to  share video on your page.
To customize the size of the player as per your requirements change the width and height in the given code. To stop autoplay video change autoplay=false.

Sign In or Sign Up now to post a comment!
All Comments (0)
No comments receieved yet, Be first to add comment
Loading...

Feature Videos

Videos Being Watched

Loading...

Other Links

Loading...

You may also like



Follow Us

We Collect Personal Information On This site.

© 2015. mrpopat.in All rights reserved.
Translate Page To Your Favourite Language